🖊️🖊️🖊️पहिली सुंदर भेट ….
आजचा दिवस माझ्यासाठी खूपच खास होता. होय.. आज पहिल्यांदा ती भेटणार होती. त्यात सकाळपासूनच जे ठरवलं ते सगळं घडून येत होतं त्यामुळे उत्सुकता अजून वाढली होती. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच अशी भेट होती. या पहाटेच्या वातावरणात एक अनामिक असा गारवा होता की तिच्या प्रेमाच्या स्वप्नात गुंग होऊन जावं असं वाटत होतं.भरगच्च अशा आभाळाने भरलेलं आकाश, आणि वाऱ्याच्या उबेने नकळत कमी होणारा गारवा घेऊन सम्पूर्ण परिसर अतिशय रम्य वाटत होता. तिथेच सुरुवात झाली माझ्या आजच्या दिवसाची. सगळं आवरून कधी एकदा बाहेर पडतोय असं वाटत होतं. आज कसा आवरलो ते माझं मलाच माहीत आणि मग निघालो . जाताना थोडी मनात धुक धुक होती…. कारणच तसं होतं…. होय तिला आज भेटणार होतो …. घरातून निघून त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत मनामध्ये खूपश्या आठवणी आणि बरेच जुने प्रसंग मनाला छेदून गेले.
त्या ठिकाणी पोचलो लवकर आलो... की वेळ झाला काही समजेना म्हणून संपुर्ण परिसरात एकदा नजर फिरवली ती कुठे दिसली नाही. मग लक्षात आलं की ठरलेली वेळ अजून आली नव्हती. मग पुन्हा एकदा स्वप्नाच्या दिशेने वाहत जायला लागलो. पण वेळीच सावरलो आणि ती येणाऱ्या रस्त्याच्या दिशेला नजर लावून उभा राहिलो. लोक येत होते जात होते. काही माझ्याकडे बघत होते मी देखील काही लोकांच्याकडे बघत होतो पण माझ्या मनाची ती चलबिचल अवस्था फक्त मलाच जाणवत होती. ती येणाऱ्या रस्त्याकडे बघत होतो. तोच ती चालत येताना दिसली. पिवळ्या रंगाची साडी नेसून हातामध्ये पर्स घेऊन .... तिची नजर देखील मलाच शोधत असल्याचं मला स्पष्ट जाणवलं. तिला पाहताच श्रावणात बहरणार्या सृष्टीप्रमाणे माझ्या भोवतालचे वातावरण बद्दलल्यासारखे वाटले. ती सरळ माझ्याकडे आली आणि माझ्या समोर उभी राहिली तिच्या नजरेला माझी नजर भिडली आणि तिच्या डोळ्यांमध्येच मला संपूर्ण सृष्टी दिसायला लागली. आमच्या काही सेकंदाच्या भेटीमध्ये बऱ्याच अव्यक्त भावना विनाशब्द व्यक्त झाल्या, नकळत दोघांच्या चेहऱ्यावर प्रेमाचे हसू उमटले आणि असे वाटले की जणू डोळे उघडून स्वप्नच बघत होतो मी.वाटलं दोन शब्द बोलावं, पण आमच्या नजरा जेव्हा एकमेकांना भिडल्या तेव्हाच आमचं बोलणं संपून गेलं होतं. पुढे काय बोलावे याची गरजच आम्हाला दोघांना वाटत नव्हती. काही वेळ तिथे एकमेकांच्या सोबत घालवावे या विचाराने आम्ही तिथेच फेरफटका मारला दोघांच्याही तोंडून शब्द निघत नव्हते. फक्त एकमेकांच्याकडे बघणं सुरू होतं. या सगळ्यात तासभर वेळ कधी निघून गेला समजलं नाही.
काही वेळाने तिचा हात हातात घेऊन कधीही साथ न सोडण्याची विनंती केल्यावर जाणवलं की आता वेळ आली होती निरोपाची, नकळत का होईना पण दोघांच्या डोळ्यांमध्ये ओलावा येत होता. इच्छा नव्हती पण …. इलाजही नव्हता. काही क्षणामध्ये अनपेक्षितपणे जे काही घडलं त्यामुळे मनात आलं की खरंच बाप्पा आपल्या पाठीशी नक्कीच आहे. तिथे जाण्याआधी मनात खूप काही गोष्टी येत होत्या पण तिथे गेल्यानंतर मनाला एका वेगळ्याच वातावरणाने स्पर्श केला होता त्यामुळे मनाला एक वेगळ्याच प्रकारचा आनंद झाला जो आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवायला मिळाला........
रोहित पाटील
9421345159
क्या बात हैं रोहित, आजच्या या आल्हाददायक वातावरणात खूप छान मेजवानी दिलीस तू..!!
ReplyDeleteमस्त रचना...!!
Thank you
DeleteSir kiti chan lehity match
Delete👍