🖊️🖊️🖊️
माझी गॅलरी...भाग 9 (सुचलेलं थोडंसं...…)
आज गॅलरीत बसून मी लिहीत होतो. थोड्या वेळापूर्वी पाऊस पडून गेला होता. माझ्या घराच्या शेजारी असलेल्या वृद्धाश्रमातील काही लोक फिरायला बाहेर पडलेले दिसले. तिघेजण होते मला त्यांची चांगली ओळख होती कारण माझं देखील वृद्धाश्रमात नेहमीचं येणं-जाणं होतं. त्या तिघांच्या घरची परिस्थिती देखील थोडीफार मला माहित होती तिघांची ही घरची परिस्थिती अगदी चांगली होती. तरी पण हे लोक इथे वृद्धाश्रमात का? असा विचार मनात आला. आयुष्यभर त्यांनी आपल्या मुलाबाळाना तळहाताच्या फोडी प्रमाणे जपलं असेल मग आता त्यांच्यावर ही वेळ का यावी. हे सगळं बघून माझ्या मनात एक विचार आला, आयुष्य खुप सुंदर आहे असं म्हणतात. आणि ते खरंच आहे. पण हे आयुष्य सर्वांसाठी सुंदर असते का? माझं आयुष्य खुप सुंदर आहे असं म्हणणाऱ्यानी खरे तर या प्रश्ना बद्दल थोड़ा तरी विचार केला पाहिजे असे मला वाटते.मी पण थोडा विचार केला .
पहिल्यांदा असं मनात आलं की, खरच किती लोक असा विचार करत असतील, आमच्या मित्रांकडून मी ऐकतोय की अगदी लहान मूले सुद्धा कोणत्यातरी आजाराने मृत्युच्या दारात उभे असतात. त्यांच्या तर आयुष्याची सुरुवात असते. आयुष्याच्या प्रकाशवाटेवरुण चालत असताना थोड्याच् अंतरावर असलेल्या थांब्यावर त्याना कायमची विश्रांती घ्यावी लागते. अशांचं आयुष्य खरंच सुंदर असेल का. सम्पूर्ण आयुष्य आपल्या मुलाबाळासाठी कष्ट केलेल्याना आज वृद्धाश्रमात राहावे लागते मग अश्या लोकांच्या मनात कधी येत असेल का की आपलं आयुष्य सुंदर आहे ?
पण आणखी थोडा विचार केल्यानंतर एक गोष्ट माझ्या मनात आली की, आयुष्य सुन्दर व्हायला परिस्थिति कारणीभूत नसते तर कारणीभूत असतात त्या मनातील भावना. कारण कित्येकदा मी माझ्या घरासमोर हे चित्र बघतो की , वृद्धाश्रमातील ते वृद्ध ना ओळख ना पाळख पण माझ्या मुलीला कडेवर घेऊन स्वतःच्या नातवंडाना खेळवन्याची इच्छा पूर्ण करुन घेतात. आणि ते पाहत असताना असे मनात येते की आयुष्य सुंदर बनविनं म्हणतात ते हेच. झोपड़पट्टीतील लहान मुले बागेत बागड़ताना कधीच त्यांच्या चेहऱ्यावर घरची परिस्थिति दिसून येत नाही अगदी मनसोक्त खेळताना ते दिसतात. त्यांचे ते दिवस, त्यांचे ते आयुष्य खुप सुंदर असते. आणि ते सुंदर आयुष्य आपोआप झालेले नसते तर ते त्यांनी स्वतः करून घेतलेले असते.
थोडक्यात, एवढंच की आयुष्य सुंदर हे आपल्यालाच बनवायचे असते ते आपोआप होत नसते. चला माझी कॉफी आली …. थांबतो मी.…..!!
रोहीत पाटील
9421345159
Nice words 👏🏻
ReplyDelete