गेल्या 4-5 दिवसातून आज पावसाने उघडीप दिली होती त्यामुळे आज मी पुन्हा माझी गॅलरी उघडली होती. खुर्ची घेऊन बाहेर जातोय तोच माझ्या पत्नीने सायलीने माझी कॉफी आणली. कॉफी घेतली आणि तिचा हात हातात धरून तिला म्हणलं तू पण बस आज इथे सामील हो आमच्या मैफिलीत. तिने देखील आनंदाने होकार दिला, आतून आणखी एक खुर्ची घेऊन आली आणि माझ्या शेजारी येऊन बसली. आमची चर्चा सुरू झाली त्यात तिने मला एक प्रश्न विचारला मी तुम्हाला इतकी का आवडते. प्रश्न थोडा गंभीर वाटला. थोडा विचार केला आणि म्हणालो.
हो... तू आवडतेस मला, म्हणून तर प्रेम करतो तुझ्यावर,तुला पाहायला आलो तेव्हाच आवडलीस तू, मनापासून प्रेम केलं तुझ्यावर म्हणून तर आपलं सगळं जुळून आलं...तू मला का आवडतेस याची कारण अनेक आहेत, खरं तर रोज एक नवे कारण तू देतेस मला तुझ्या प्रेमात नव्याने पडायला...
तू सुंदर दिसतेस म्हणून आवडतेस मला असं नाही पण मनाने खूपच सुंदर आहेस म्हणून तू आवडतेस. माझ्यावर प्रेम करतेस म्हणूनच नाही पण माझी खूपच काळजी करतेस म्हणून तू आवडतेस मला. तू मला आवडतेस लहान मुलीसारखी वागतेस म्हणून नाही पण खूप maturity दाखवतेस कधी कधी म्हणून...
तू आवडतेस मला माझ्यावर रुसतेस म्हणून नाही तर मी रुसल्यावर मला मनवायला येतेस म्हणून....तू आवडतेस मला busy असतेस म्हणून नाही पण कितीही busy असलीस तरी माझ्यासाठी वेळ काढतेसच म्हणून… तू आवडतेस मला माझ्याकडे बोलायला काही नाही हे माहिती असते तूला... पन माझ्याशी बोलल्याशिवाय तूला अन मला झोप येत नाही म्हणून… तू आवडतेस मला माझ्याशिवाय राहू शकत नाहीस तू म्हणून नाही तर आपल्या दोघांच्या मनामध्ये असलेल्या अज्ञात अशा कनेक्शन मुळे...
तू आवडतेस मला माझ्या तूला न आवडणाऱ्या गोष्टीतही आवडीने भाग घेते म्हणून नाही तर त्यात तूला ही आवड आहे हे जाणूनबुजून दाखवतेस म्हणून….
तू आवडतेस मला माझ्याशी खूप भांडतेस म्हणून नाही तर त्यातून माझं प्रेम वाढवतेस म्हणून...
तू आवडतेस मला कारण तूला सगळ जमतं … प्रेयसी बनून प्रेम करणं, आई बनून काळजी करणं, मैत्रीण बनून मला समजून घेणं, एवढंच नाही तर या सगळ्यांपेक्षा सुगरणी सारखा स्वयंपाक करतेस तू म्हणून...
तू आवडतेस मला पहिल्यांदा भेटायला आलीस म्हणून नाही तर माझ्या डोळ्यात डोळे घालून मला i love you बोललीस म्हणून...
तू आवडतेस मला कारण मी सोबत नसताना रोज माझी आठवण काढतेस म्हणून नाही तर माझ्या विचारात रात्र जागून काढून स्वतःला त्रास करून घेतेस म्हणून….
तू आवडतेस मला आजारी पडतेस म्हणून नाही तर माझ्यासाठी सगळा त्रास सहन करतेस म्हणून...
तू आवडतेस मला प्रेम जपतेस म्हणून नाही तर मैत्रीही तेवढीच करतेस म्हणून...
तू आवडतेस मला मी लिहितो म्हणून नाही तर आज तू मला का आवडतेस हे एवढं लिहून पण मला अजून अपूर्ण भासतेय म्हणून……..….
म्हणून तू मला आवडतेस एवढंच…...
No comments:
Post a Comment