आयुष्य पण ना किती तरी वेगवेगळे अनुभव देत असते. एखादा दिवस आपला खुप आनंदी जातो तर एखाद्या दिवशी दुःख आपल्या खांद्यावर हात ठेऊन बसते. खरं तर समाजात जसे आपले चांगले व वाईट मित्र असतात. तसे आनंद आणि दुःख हेसुद्धा आपले मित्रच असतात. जीवनात आपण आपल्या मित्रांकडून खुप कही शिकत असतो. तसाच आपन आनंदात ही चांगले अनुभव शिकत असतो तर दुःखात ही अनेक अनुभव शिकत आपल्याला येत असतात.
जीवन नेहमी आपली फिरकी घेत असतं की जेणे करुन आपल्याला आयुष्यात सगळे अनुभव मिळावेत. मी असं म्हणेन की माणसाला आलेल्या प्रत्येक चांगल्या वाईट अनुभवाना त्याने लक्षात ठेवावे कारण भविष्यात ते अनुभव नक्कीच उपयोगी पडतात.
आपण आपलं मन शरीर फ्रेश करण्यासाठी किंवा मन आनंदी करण्यासाठी सुट्टीत निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जातो. पण अशाच निसर्गरम्य ठिकाणी राहणाऱ्या जगातील वयाने सर्वात लहान नोबेल पुरस्कार विजेत्या 'मलाला युसूफझाई' हिचे अनुभव काही वेगळेच सांगतात. ती म्हणते 'जगातल्या सर्वात स्वर्गाहुन ही सुन्दर मानल्या जाणाऱ्या स्वात खोऱ्यात आम्ही नरकापेक्षा वाईट जीवन जगत होतो'
थोडक्यात काय तर आनंद व दुःख हे सभोवतालच्या परिस्थितीवर अवलंबून नसते तर ते आपल्या विचारांवर अवलंबून असते. म्हणून नेहमी आपल्या मुखात हास्य असले आणि मनात आनंदी चांगले विचार असले की दुःखाला आपल्या मनात फार थोड़ी जागा मिळते. असे मला वाटते.
--- रोहित पाटील
खरंय रोहित दादा...!!
ReplyDelete