मोरया .....
गणपती बाप्पा च्या नामस्मरणाने आजच्या दिवसाची सुरवात झाली.
सकाळी उठल्यानंतर खिडकीत डोकावून पाहिले तर वातावरण इतकं आल्हाददायक होतं की लगेच आवरून फिरायला बाहेर पडलो
घराच्या दरवाज्यातून बाहेर पडताच तो पहाटेच मंद आणि थंडगार वारा संपूर्ण शरीराला झोम्बताच अंगावर शहारे आले
लगेचच सायकल काढली आणि निघालो त्या थंडगार वाऱ्यावर स्वार व्हायला
आज सुट्टी होती इच्छा होती की कुठेतरी लांबचा पल्ला मारून यायचं पण लॉकडाउन असल्यामुळे त्या इच्छेवर विरजण घालाव लागलं मग काय शेवटी कॉलनीतच फेऱ्या मारायच्या ठरवल्या आणि निघालो
2-3 फेऱ्या झाल्या असतील तेव्हा समोरच्या झाडांमधून डोके वर काढताना सूर्य राजाचे दर्शन झाले. आणि ती सूर्योदयाची छबी पाहता मन सुखावून गेले.
मग काय त्या सुर्यराजाला सोबत घेऊन आणखी 3-4 फेऱ्या मारल्या. आणि मनातल्या मनात सूर्याला सलाम ठोकून दिवसाची सुरुवात अविस्मरणीय केली......👍
No comments:
Post a Comment