🖊️🖊️🖊️आयुष्यात जगायला शिकणं फार महत्वाचे आहे. आणि ते जगणं मला एका व्यक्तीनं शिकवलं. तिच्या येण्याने माझ्या आयुष्यात असे काही बदल झाले की त्यामुळे मला जगणं कळलं, तिच्या येण्याने मला माझ्या मनाची जाणीव झाली आणि मनाच्या इच्छेने मी जगायला शिकलो. आणि खऱ्या अर्थाने….. प्रेम करायला शिकलो. तशी माझी आणि तिची ओळख ही अनावधानाने झाली नव्हती सगळं ठरवूनच झालं होतं.
आजपर्यंतच्या आयुष्यात कधीच कुणाला इतकं miss केलं नव्हतं जेवढं ती सोबत नसताना तिला करतो. तिचा हात जेव्हा हातात घ्यायचो तेव्हा आमची साथ कधी सुटणार नाही याची काळजी घ्यायचो… देवानं काहीतरी विचार केला असेल ना…. की त्याने आमचं नातं जुळवलं.... कधी कधी ती माझ्यावर खुप रागवायवची, कधी मी पण तिच्यावर खूप रागवायचो पण पुन्हा दुसऱ्या क्षणी आम्ही एकत्र यायचो कारण भीती होती एकमेकांना गमवायची.. खरं तर माझंच नशीब चांगलं की मला तिच्यासारखी समजून घेणारी, जीव लावणारी,काळजी करणारी आणि वेड्यासारखं प्रेम करणारी सखी मिळाली आजच्या युगात भलेही किती सोशल डिस्टनसींग असेल पण आमच्या नात्यात कधीही कुठलाच दुरावा येणार आणि आम्ही आणणार ही नाही. तिच्यात राग इतका आहे की तिला बोलू वाटत नाही माझ्याशी पण प्रेम देखील इतकं आहे की माझ्याशिवाय राहू देखील शकत नाही. असं म्हणतात की सुख दुसऱ्यासोबत वाटलं की वाढतं… पण ती माझं असं सुख आहे की ते मी कुणाशीही share करू शकत नाही..
काही दिवसाच्या अंतराने म्हणतात की नाती दुरावतात. पण आमचं नातं हे म्हणणं फोल ठरवतं कारण जसा काळ जात आहे तसं आमचं नातं आणखी दृढ होत चाललं आहे. कधी आयुष्यात वाट चुकलो तरी साथ न सोडता हक्काने मला समजून घेते आणि समजावून सांगते. काही क्षण असे असतात की तिथे स्पर्शापेक्षा शब्दांची गरज असते. त्यावेळी ते शब्द मला तिच्याच ओठातून ऐकावेसे वाटतात. अशी खूप कमी लोकं भेटतात की छोट्या चुकांना माफी देऊन आपल्याला समजून घेतात. असं म्हणतात की प्रेमात नेहमी काटेच असतात कारण फुलच आपल्याला गुलाबाचं आवडलेलं असतं त्या काट्यामुळेच तर प्रेमाला बहर येतो असे मला वाटते. कधीच कोणत्या गोष्टीसाठी माझा जीव तळमळत नाही पण ती नसताना तीला भेटण्यासाठी आणि बोलण्यासाठी मात्र जीव तळमळतो. मी तिच्यासाठी किती important आहे हे मला तिच्या एका smile मधून कळून जातं.
तिच्याबद्दल लिहावं तितकं कमीच. तिच्याबद्दल सुचायचं काय थांबणार नाही आणि माझं लिहायचं काय थांबणार नाही तेव्हा शेवटी एवढंच वाटतं की आयुष्यभर तुझी साथ हवी. केलीस माझ्यावर प्रेम ते निभावण्याची आस तुझ्यात हवी… बस्स एवढंच…..
No comments:
Post a Comment