एक रम्य संध्याकाळ ......
🖊️🖊️🖊️कसं करावं .... आजच्या संध्याकाळचं वर्णन. एक रम्य अशी संध्याकाळ आज अनुभवायला मिळाली दुपारपासून कशातच मन लागत नव्हतं, सारखं वाटत होतं, माझ्या मुलीला म्हणजे स्वराला माझी नक्कीच आठवण येत आहे. शाळा सुटल्या सुटल्या गाडीची किक मारून जेव्हा घरी आलो तर गेटवर ती उभीच होती. मला पाहताच तिच्या चेहऱ्यावर जो बदल झाला. तो प्रसंग अनुभवणं एका मुलीच्या बापाच्या नशिबीच असेल. सुर्य मावळत होता आणि वातावरणातील प्रकाशाला मागे सारून अंधार पुढे दवडू पाहात होता अशा वातावरणात सुद्धा माझ्या मुलीच्या चेहऱ्यावरचे ते आनंदाचे तेज मला स्पष्ट दिसत होते. चेहर्यावर रुमाल, डोक्यावर टोपी आणि डोळ्यावर गॉगल असा माझा पूर्णपणे झाकलेला चेहरा असून ती मला ओळखते याचं तर नवल वाटतच पण मला पाहून आत आईला देखील सांगत जाते बाबा आले - बाबा आले याच मला खरं आश्चर्य वाटतं आणि तो तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून दिवसभराचा थकवा कुठच्या कुठे पळून जातो.
खरी तर हीच सुरुवात होती माझ्या या संध्याकाळची. घरात आल्यानंतर आवरून लगेच भूक लागल्याची इच्छा व्यक्त करावी आणि माझ्या पत्नीने सांगाव की बसा जेवायला सगळं गरमच आहे . हा माझ्या या संध्याकाळचा दुसरा आनंदाचा क्षण. जेवल्या नंतर बाहेर घराच्या पायरीवर बसून मस्त संध्याकाळ अनुभवावं या विचाराने बाहेर येतोय तोच स्वराने माझा हात पकडून मला म्हणाली कि आपण फिरायला जायच. तिला घेऊन घराच्या बाहेर पडलो तोच वातावरणाचा तो अनमिक थांडावा जसा अंगाला झोंबला तोच दोन मिनिटे डोळे मिटून तिथच उभ राहावं असं वाटलं
पण आमच्या कन्येला फिरायला जायचा होतं. तेव्हा त्या दिसणाऱ्या मावळत्या सुर्याला सलाम ठोकुन तिने केलेल्या हाताच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली. आणि संध्याकाळ सारून गेली. या सुखद क्षणांबद्दल देवाचे मनापसून आभार ........
रोहित पाटील
9421345159
अप्रतिम भावना
ReplyDeleteSuper 👌🏼
ReplyDelete