थोडंस मनातलं....

         


           प्रत्येक पाऊस आयुष्यात नवीन काहीतरी घेऊन येतो असं म्हणतात माझ्याही आयुष्यात थोडंबहुत तसंच काहीसं झालं अगदी वळीवाच्या पावसापासून. काही दिवसांपूर्वी वळीवाचा पाऊस जसा काही आला तसा माझ्या मनामध्ये विचारांचं वादळ उठलं. आणि त्या वादळातुन तयार झालेल्या माझ्या विचारांना भावनेचा एक स्पर्श झाला. त्यातून एक प्रकारचं वलयच निर्माण झालं. माझ्या आयुष्यात नाविणहून कळलेली प्रत्येक गोष्टीचा या पावसाळ्यातील प्रत्येक पावसाबरोबर आठवलेल्या क्षणांबरोबर मेळ घालण्याचा प्रयत्न करतोय. या आठवणींच्या ओलाव्यात भिजून जात असताना मी बऱ्याच अंशी माझ्या भावनांना वाट करून दिली.

            खरं तर या आठवणी कायम स्मरणात आहेत हेच माझ्यासाठी एक सुखद आणि मनाला अत्युच्च आनंद देणारी गोष्ट आहे. गेले काही दिवस मी थोडंफार लेखन केलं. बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया आल्या तस मनाला खूप बरं वाटलं. पावसाळ्याच्या या वातावरणाला धरून मनात तयार हे मळभ काही अंशी तरी मी मोकळं केलं. आणि हवेतला गारठा जसा शरीराला झोम्बतो तसं मनाच्या हिंदोळ्यातून निघणारा प्रत्येक झोका काळजाला छेदून पुढे जातो आणि परत येताना मात्र सुखाची गिरकी घेऊन येतो. या विचारांच्या गर्दीतून जात असताना मला एक गोष्ट कळली की जीवनाकडे बघण्याची वृत्ती आपले आयुष्य खरंच खूप सुंदर बनवते. माझ्या शिक्षकी पेशाने मला सर्व काही दिलं अगदी मनासारखं जगायला शिकवलं पण तरी देखील अपूर्णतेच्या जाणिवेनं कासावीस असलेलं हे मन कुणास ठाऊक कुठल्या क्षितिजावर जाऊन थांबणार …… असो माझ्या मनाची गाथा कधीच संपणार नाही तेव्हा आज थांबतो इथेच मी …...धन्यवाद

No comments:

Post a Comment

ईच्छाओंके अनुरूप जिने का जुनून होना चाहिए,

​ ईच्छाओंके अनुरूप जिने का जुनून होना चाहिए ,   वरना परिस्थितीयां तो सदैव ही विपरीत होती है … आज डायरी उघडताच ...