माझी गॅलरी.... भाग 3


माझी गॅलरी ...भाग 3
🖊️🖊️🖊️आज माझ्या गलरीतलं दृश्य थोडं वेगळं होतं. रोज एका वेगळ्याच उत्कंठेने वाट पाहायला लावणारा पाऊस आज दिवसभर धो धो कोसळत होता. जिकडे नजर फिरवावं तिकडे नुसता पाणीच पाणी दिसत होतं. पत्र्यावर पावसाच्या थेंबा पडून होणाऱ्या आवाजा व्यतिरिक्त आज कोणताच आवाज कानावर येत नव्हता. रोजच्या मैफिलीत असणाऱ्या माझ्या चिमण्यांची देखील चिवचिवाट आज बंद होती. कारण पाऊसच तसा होता. 
            मनात एक क्षण असा विचार आला की रोज आतुरतेनं वाट पाहायला लावणार पाऊस आज कधी थांबतोय याची वाट पाहत बसलो. कारण त्याशिवाय माझी मैफिल रंगणार नव्हती. इतक्यात माझी कॉफी घेऊन माझी बायको तिथे आली. अलगद कप माझ्या हातात दिला आणि ती ही त्या पावसाकडे पाहू लागली. साहजिकच तिच्याही मनात तोच विचार आला असेल कधी थांबतोय पाऊस. मी तिच्याकडून माझी नजर वळवली आणि माझे लक्ष समोरच्या लिंबाच्या झाडाकडे गेले. दिवसभराच्या पावसाचे थेंब झेलून ओलेचिंब भिजलेले ते लिंबाचं झाड थोडं थकल्यासारखं वाटलं मला …   
           लिंबाच्या झाडावरच्या घरट्याकडे थोडं निरखून बघितले त्यात चिमण्या दिसत नव्हत्या कदाचित त्यांनी या पावसापासून सुरक्षित जागा शोधली असेल बहुतेक…  काही वेळाने पाऊस हळू हळू कमी व्हायला लागला आणि पूर्ण थांबला. तोच माझ्या लाडक्या चिमण्यांची आकाशातली झेप नजरेसमोर आली. थोडा वेळ मनसोक्त आकाश हिंडून त्या पुन्हा घरट्याकडे आल्या त्यांना पाहून खुप बरं वाटलं… पाऊस पूर्ण थांबला होता. दिवसभर चरण्यासाठी बाहेर पडलेली गुरे घराच्या दिशेने जाताना दिसली. सगळीकडे एकदम शांतता पसरली होती, त्यातून कुठेतरी पाण्याचा थेंब पडल्याचा आवाज येत होता  आणि ती शांतता भंग करत होता. या सगळ्याना सोबत घेऊन पुन्हा एकदा निसर्गाने त्याची अप्रतिम झलक दाखवली जी मनाला भावणारी तर होतीच पण अविसमरणीय देखील होती…….

                                   रोहित पाटील.(9421345159)

1 comment:

ईच्छाओंके अनुरूप जिने का जुनून होना चाहिए,

​ ईच्छाओंके अनुरूप जिने का जुनून होना चाहिए ,   वरना परिस्थितीयां तो सदैव ही विपरीत होती है … आज डायरी उघडताच ...