माझी गॅलरी -- 2
आज पुन्हा मी माझ्या गॅलरीत येऊन बसलो आणि समोरच्या लिंबाच्या झाडाकडे बघू लागलो….त्या झाडावरच्या घरट्यात राहणाऱ्या चिमण्यांनी काल माझी संध्याकाळ सुंदर बनवली होती. पण आज त्या चिमण्या गायब होत्या… मी थोडं इकडे तिकडे बघितलं पण त्या कुठेच दिसत नव्हत्या.. तोवर माझी बायको कॉफी चा कप घेऊन आली तिच्या हातातून कप घेतला… काल यावेळी आमच्या मैफिलीत पावसाने सुद्धा हजेरी लावली होती… पण तो देखील आज कुठेच दिसत नव्हता…. मन थोडं उदास झाल्यासारखं वाटत होतं…. कॉफी चा एक घोट घेतला आणी डोळे मिटून मनापासून त्याची चव अनुभवायला लागलो.
डोळे अजून मिटलेले होते. तेवढ्यात कुठूनतरी चिमण्यांची चिवचिवाट ऐकायला आली.... तो ऐकून इतका आनंद झाला की क्षणात डोळे उघडले, उठून उभा राहिलो आणि इकडे तिकडे बघू लागलो…. तोवर तो आवाज देखील गायब झाला. मनाची इतकी चलबिचल अवस्था या आधी कधी झाली नव्हती. पुन्हा कॉफी हातात घेऊन खुर्चीवर बसलो. काही वेळ विचार करण्यात निघून गेला. तोवर पुन्हा एकदा चिमण्यांची चिवचिवाट कानावर आली आणि बघतोय तो काय त्या चिमण्या झाडाच्या एका फांदीवर येऊन बसलेल्या होत्या. त्यांना बघून मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा उत्साह निर्माण झाला. अत्ता पर्यंत कॉफी संपलेली होती. चिमण्या त्यांचा खेळ खेळत होत्या. एक फांदीवरून दुसऱ्या फांदीवर असा. मी ते सगळं डोळ्यात सामावून घेत होतो. इतक्यात थंडगार वारा अंगाला झोंबला. आणि टप्प टप्प असा आवाज यायला लागला. पाऊस देखील आमच्यात सामील झाला. आणि पुन्हा एकदा सृष्टी पाहण्यासारखी देखणी होऊन मनाला भुरळ पडायला लागली…….
रोहित पाटील (9421345159)
No comments:
Post a Comment