आजची सकाळ

           


 आजची सकाळ ,   

             आज थोडा उशीरच झाला, बाहेर पडलो तसा अजून अंधुकच प्रकाश पसरलेला होता.त्यात आभाळ आलेलं होतं. नेहमीचा सोबती सूर्य आज बराच वेळ झाला तरी अजून दर्शन देत नव्हता, म्हटलं ठीक आहे अजून थोडा वेळ वाट बघू, मनातला हा विचार संपेपर्यंत लक्ष्मी मंदिरापर्यंत पोचलो. बाहेरून च हात जोडून पुढे निघालो. आजच्या वातावरणात एक विलक्षण उत्साह जाणवत होता त्यामुळे नेहमी पेक्षा थोडं लांब जायचं ठरवलं.

               मनामध्ये विचाराचं हे काहूर उठलं होतं त्यात कधी नवीन पुलाच्या मध्यावर पोचलो हे समजलंच नाही. पुलावरून दिसणारं विलोभनीय दृश्य पाहून कधी नव्हे ते 2 मिनिटे थांबण्याची इच्छा झाली.ढगाळ वातावरण, मंद वाऱ्याची झुळूक जी घामाने भिजलेल्या सर्वांगाला एका वेगळ्याच पद्धतीने खेटून जात होती.आणि समोर चहू दिशांनी पसरलेल्या माझ्या लाडक्या शहराचे मनाला भुरळ पाडणारे दृश्य जवळ जवळ शहराच्या बर्याच भागाचे दर्शन या पुलावरून होत होते.तेवढ्यात काही सेकंदासाठी मला माझ्या रोजच्या साथीदाराने दर्शन दिले तिथेच हात जोडला आणि परतीच्या वाटेला लागलो.निसर्गाने गुंफलेल्या वातावरणाच्या अप्रतिम रंगसंगतीचा आज मी साक्षीदार झालो ही गोष्ट मनातल्या मनात घोळत घर कधी आले समजले नाही....

2 comments:

  1. एक नंबर भावा.... लिहीत राहा..!!

    ReplyDelete
  2. Such a natural expression of inner feels

    ReplyDelete

ईच्छाओंके अनुरूप जिने का जुनून होना चाहिए,

​ ईच्छाओंके अनुरूप जिने का जुनून होना चाहिए ,   वरना परिस्थितीयां तो सदैव ही विपरीत होती है … आज डायरी उघडताच ...