🖊️🖊️🖊️
मला आपल्या आयुष्याबद्दल कुणाशी संवाद साधला तर बरं वाटतं. म्हणून मी आणि माझी पत्नी सायली आम्ही नेहमी अश्या गप्पा मारत असतो आणि त्यातच जर पूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या तर मग काय सांगायलाच नको. आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय दिवस जेव्हा आठवतात तेव्हा त्याची किंमत काय असते ते जाणवते.
रोजची दैनंदिनी लिहिताना वेळोवेळी जाणवतंय कि ४-५ वर्षापुर्वीचं लिहिणं आणि आजचं लिहिणं यात खूप फरक जाणवतोय. कशामुळे हे माहित नाही. पण फरक पडला आहे. त्यावेळचा दिनक्रमच असा होता कि डायरी ची दोन पानं देखील कधी संपायची कळत नव्हतं. आज मात्र मन इतकं शांत झालय कि एक पान सुद्धा भरवत नाही. हे कशामुळे झालंय समजत नाही. खूप विचार केला, पूर्वीसारखं जगण्याचा प्रयत्न केला ....पण नाही, ते दिवस पुन्हा येणे शक्य नाही. असं म्हणतात कि माणसाच्या आयुष्यात चांगले दिवस हि तितके असतात जितके आपण नशीब दाखवेल त्या वाटेने कोणतीही अपेक्षा न ठेवता आनंदाने जात असतो, पण ज्यावेळी आपण नशिबाला दोष देऊन त्याच्या विरुद्ध दिशेने जायला लागतो त्यावेळी आपण आपल्या चांगल्या दिवसांपासून दूर जायला लागतो अस मला वाटते. देवाने आपल्या तळहातावर नशिबाच्या रेषा तर दिलेतच पण त्यात रंग आपणालाच भरावा लागतो. म्हणून मला असं वाटतं कि माणसानं जीवनाकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता ते नेईल त्या दिशेने आनंदाने जावं कारण नशीब,आयुष्य,जीवन ह्या कुठल्या दुसर्या गोष्टी नसून आपणच आपल्या कर्तुत्वाने,स्वभावाने बनविलेले विश्व असतं.आपला स्वभाव आणि आपलं कर्तुत्व हेच जगण्याचे ध्येय्य आणि जगण्याची नवी उमेद निर्माण करून देतात. आपल्याकडे जे नाही त्याबद्दल विचार करत बसण्यापेक्षा जे आहे त्याचा योग्य वापर केला की जग आपोआपच सुंदर दिसायला लागेल. आणि खरंच आहे .... 'ये जिंदगी एक पहेली है, जिसे अपने अपने हिसाब से ही सुलझाना पडता है, तभी उसे जीनेका असली मजा आने लगता है।'
...... धन्यवाद 🙏
जबरदस्त...!! आणि शुभेच्छा..!!
ReplyDelete