बऱ्याच दिवसानंतर.....


🖊️🖊️🖊️🖊️🖊️

बऱ्याच दिवसानंतर.....
 
           नमस्कार …. मित्रांनो कसे आहात . सगळं ठीक ठाक असेल ना…….असेलच नक्की …... चांगलं आहे……बरेच दिवस झाले आपणासमोर येऊन …. कारण देखील तसं…. मनामध्ये एक प्रकारची पाठरावस्था निर्माण झालीय. कुणाशी काही बोलू वाटत नाहीय एवढंच काय कुणाचं काही ऐकूही वाटत नाहीय …. नेहमी सारख खळखळून हसू वाटत नाहीय ….  दैनंदिन कामाचा विचार करून मन इतकं दमून जातंय की पुन्हा त्यात विचारांची मैफिल काही केल्या बसवत नाहीय…… तरी आज बऱ्याच दिवसाच्या अंतराने आपणासमोर एक विषय घेऊन आलो आहे . विषय म्हणता येणार नाही तसा …….. आपणा सर्वांचं आयुष्यच ते ……. गेली काही दिवस मी थोडा विचार करतोय की आपण सगळे आपल्या जीवनात दुहेरी पात्र साकारतोय…...दुहेरी म्हणजे आपण जगाला दाखवतोय एक आणि मनाला समजावतोय दुसरंच….खरंय ना… खरंच आहे. बरेच जण या गोष्टीला मान्य होणार नाहीत पण हेच सत्य आहे. जगाला आपण दाखवतोय की आपण किती खुश आहोत आयुष्यात….  आपल्या फॅमिली ला दाखवतो की आपलं सगळं किती छान चाललंय ….. पण जेव्हा आपण एकटेच आपल्या बेडरूम मधील आरशासमोर उभे राहतो तेव्हा मात्र आपण आपल्या सत्याशी तोंड फिरवू शकत नाही. त्यावेळी आपण जाणतो की … यार किती एकटे आहोत आपण …… मनातून पार तुटलेले, खचलेले…… आपलं खरं पात्र आपल्या समोर उभं राहिलेलं दिसतं….. याहून एक वाईट गोष्टी म्हणजे ते जे आपलं खरं रूप…..खरं पात्र….. आपण कोणासमोर मांडू पण शकत नाही ……. कारण तो आपला स्वभाव नसतो. 

            खरं सांगायचं तर आजही लिहायचा मूड नव्हताच पण या मनाला आणि विचाराना कुठेतरी वाट मोकळी करून देणं गरजेचं असतं असं म्हणतात. म्हणून मग घेतली डायरी हातात…. आज सकाळची शाळा होती.….. शाळेत कार्यक्रम होते . एक कार्यक्रम महिला दिनाचा आमच्या प्रायमरी च्या मुलांचा ….आणि दुसरा आमच्या 10 वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा ….. प्रायमरी च्या मुलांनी निरनिराल्या वेशभूषा केल्या होत्या….. लहान लहान मुली आज साडी नेवून सावित्री च्या लेकी वाटत होत्या. त्यातल्या काही चिमुकल्यानी पोलिसी युनिफॉर्म घातला होता ते त्यांच्या नादात आनंदात मिरवत होते ….. आमच्या 10 वी च्या विद्यार्थ्यांचा शाळेतील आज शेवटचा दिवस होता. एकंदरीत सगळ्यांच्याच चेहऱ्यावर आनंद दिसत होता. 

             या सगळ्यात का कुणास ठाउक मी देखील कुठेतरी आनंद शोधण्याचा प्रयत्न करत होतो पण दिवसभरात मला ते काही साध्य झालं नाही. माझं आवडीचं काम ….फलकलेखन…. ते करताना देखील मनापासून आज हात वळत नव्हते. तीन ठिकाणी फलक लेखन केले पण कुठलेच माझ्या मनात उतरले नाही. कार्यक्रम सुरू झाला कधी  …. संपला कधी काही समजले नाही. बसलो विचार करत ऑफिस मध्ये ….. की हे असं का होतंय …. तेव्हा मोबाईल चाळत असताना एक छान व्हिडिओ माझ्या समोर आला तो संपूर्ण व्हिडीओ बघितला आणि लक्षात आलं की….. नाही यात आपणच नाही तर प्रत्येक जण आहे जो माझ्यासोबत आहे ….. फक्त तो कुणाला सांगत नाही ….. भला कसा सांगेल बरं….. स्वतःला थोडेच कुणी कमजोर म्हणून घेईल…. मी देखील सगळ्यांना सांगत असतो की  ……. टेन्शन घ्यायचं नाही... ही एक वेळ असते ती निघून गेली की सगळं ठीक होतं…. कधी कधी मी स्वतः माझ्या मनाला देखील हे सांगतो… 

           मित्रानो, खरं यालाच जीवन म्हणतात . नदीच्या शांत वाहणाऱ्या पाण्याकडे बघून आपणाला इतका आनंद होत नाही जितका खाच खळग्यातून मोठा आवाज करत वाहणाऱ्या पाण्याकडे बघताना होतो. हीच प्रकृती आहे. आयुष्यात खाच खळगे येणं त्यातून आपण वाट काढणं. आणि ते काढताना येणाऱ्या संकटावर पांघरून घालून एकटेच त्याच्याशी लढणं यालाच जीवन म्हणतात असं मला वाटतं. आयुष्य आपल्या समोर तो प्रत्येक क्षण आणतं ज्यामुळे आपल्या प्रत्येक प्रश्नच उत्तर मिळतं फक्त तो क्षण आपल्याला हेरावा लागतो…. चला आज थांबतो इथे ….. खूप वेळ झालं बसलोय … माझी कन्या  खूप वेळ झालं माझी वाट बघतेय उद्या तिची चित्रकलेची स्पर्धा आहे आणि तिला चित्र शिकवायचं आहे…. तेव्हा……

…… नमस्कार…….🙏

                                                रोहित पाटील 

                                             9421345159

           

No comments:

Post a Comment

ईच्छाओंके अनुरूप जिने का जुनून होना चाहिए,

​ ईच्छाओंके अनुरूप जिने का जुनून होना चाहिए ,   वरना परिस्थितीयां तो सदैव ही विपरीत होती है … आज डायरी उघडताच ...