आय लव्ह मनी......

   
🖊️🖊️🖊️🖊️
 आय लव्ह मनी......

      मित्रानो आज मी आपणासमोर एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहे. तसं वेगळा म्हणजे आपला सगळ्यांचा आवडताच विषय आहे. ..... हो सगळ्यांचा आवडता विषय म्हणजे ....... पैसा ....... मला वाटत की जगात असा कुणीही व्यक्ती नसेल कि त्याला पैसा आवडत नसेल. 
      मित्रानो आज हा विषय निवडायच कारण म्हणजे. मी नुकतच एक पुस्तक वाचलं लेखक सुरेश पद्मनाभ यांनी लिहिलेलं ‘आय लव्ह मनी’ पुस्तकाच शीर्षक वाचून तुम्हाला थोडं वेगळ वाटेल पण .... जो व्यक्ती पैशांवर प्रेम करते त्या प्रत्येक व्यक्तीने हे पुस्तक वाचवे असं माझ मनापसून मत आहे.
      या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर एक वाक्य लिहील आहे ‘ जेव्हा तुम्ही पैशाकडे लक्ष देता तेव्हा तो वाढायला लागतो ’ या वाक्यानेच मला विचार करण्यास भाग पाडले. मुळ भाषा सोडून 11 भारतीय तसेच विदेशी भाषांमध्ये हे पुस्तक अनुवादित झालेलं आहे. शिवाय माझ्या हाती लागलेली हि द्वितीय आवृत्ती आहे. 
      पैशाभोवती दुनिया फिरते ..... असं म्हणतात ते काही खोट नाही ..... हो ना ? सारं जग पैशाच्या तालावर नाचतं. काहीवेळा तो आपल्या खिश्यात नसतो पण मनात मात्र नेहमी असतो. प्रत्येकाचं लक्ष खेचून घेण्याची  त्याच्या इतकी ताकद दुसर्या कशातच नसेल कदाचित ..... या पुस्तकात त्यांनी पैशाबद्दल आणि त्याच्या नियोजनाबद्दल असे काही नियम सांगितलेले आहेत कि ते प्रत्येक व्यक्ती अगदी सहज समजून जाईल आणि ते नियम अंगीकारल्याशिवाय राहणार नाही हे नक्की. 
      मी कितीतरी लोकांना असं बघितलं आहे की आयुष्यभर पैसा मिळवण्यात स्वतःच आरोग्य गमावतात आणि नंतर ते सुधारण्यासाठी अमाप पैसा ओततात. पण मित्रानो आत्तापासून आपण पैशाचं योग्य नियोजन केलं तर अशा लोकांपेक्षा खूप वेगळ आणि आनंदी जीवन आपण जगू शकतो. या पुस्तकात एक वाक्य आहे ‘जगातील प्रत्येक व्यक्तीला एक पुस्तक खूप प्रिय असत. ज्याला तो सर्वश्रेष्ठ पुस्तक मानत असतो ते म्हणजे बँकेच खाते पुस्तक’ आणि खरच आहे प्रत्येक व्यक्तीला ते पुस्तक आवडीचं असतच. 
      आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो कि जीवनात पैशाला काही महत्व नाही. पण मला सांगा आपल्याला तो आवडो किंवा नावडो त्याच्याशिवाय आपण राहूच शकत नाही. हे देखील तितकच सत्य आहे ना ? मग मी काय म्हणतो थोडं जास्त महत्व दिलं म्हणजे बिघडलं कुठे. आणि असं केल्याने नुकसान तर नक्कीच होणार नाही. हेच या पुस्तकात लेखकांनी सांगितलेलं आहे. आणि विशेष म्हणजे या पुस्तकात असं नाही कि एकदा एखादा लेख चालू झाला कि पन्नास एक पानापर्यंत जाईल. खर तर हीच मजा आहे या पुस्तकाची या मध्ये प्रत्येक घटक हा फक्त 1 किंवा जास्तीत जास्त 2 पानाचा आहे त्यामुळे वाचण्यास कंटाळा देखील येत नाही. ज्या लोकांना पुस्तक वाचनाची सवय नाही अशांची लेखकांनी पुरेपूर काळजी घेतलेली आहे. ज्यांना वाचानाची सवय लावून घ्यायची आहे त्यांनी तर या पुस्तकापासून सुरुवात करावी या मताचा मी आहे. 
      थोडक्यात एवढच सांगेन कि हे पुस्तक वाचल्यानंतर जेव्हा तुम्ही म्हणाल कि ‘ माझं पैशावर प्रेम आहे ’ तेव्हा तुम्हाला पैसा आता जेवढा वाटतो त्यापेक्षा आकर्षक आणि बहुमूल्य असल्याचं दिसून येईल . लेखकांनी शेवटी लिहिलं आहे कि ‘देशातील प्रत्येक व्यक्तीची आर्थिक सजगता हेच माझं ध्येय आहे. आणि आर्थिक सजगतेशी तुमचे सूर जुळले कि तुमच्याकडे झपाट्याने पैसा येत राहील.’  

                                                रोहित पाटील
                                              9421345159

ईच्छाओंके अनुरूप जिने का जुनून होना चाहिए,

​ ईच्छाओंके अनुरूप जिने का जुनून होना चाहिए ,   वरना परिस्थितीयां तो सदैव ही विपरीत होती है … आज डायरी उघडताच ...