आयुष्याची कातरवेळ...

🖊️🖊️🖊️

आयुष्याची कातरवेळ….

              आयुष्य संपत चाललंय का..? आज काल मनात खूपवेळा हा प्रश्न येऊन राहतोय. आणि शांत मनाला अशांत करून जातोय. दिवस कामात निघून जातो आणि रात्र विचारात सरुन जाते. पण या सगळ्यात मन कशात तरी अडकून चाललंय आणि शरीरही थोडं थकून चाललंय. हे मात्र समजतंय, कळत नाहीय की मी माझ्या मनासारखं जगतोय की दुसऱ्याचं मन राखतोय. आपल्या व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला साजेशी भूमिका करणं का शक्य होत नाहीय…. कदाचित यालाच आयुष्य म्हणत असतील….

            शाळेतून घरी आल्यानंतर थोडे पाय मोकळे करण्यासाठी घराबाहेर पडलो रस्त्यावर एक जोडपं बघितलं कदाचित दोघे पतिपत्नी होते वय साधारण सत्तरी ओलांडलेलं दिसत होतं. दोघे चालत चालत एका मोबाईल मध्ये काहीतरी बघत होते. मी त्यांच्या जवळून जाताना त्यांच्या मोबाईलमधील एक लहान मुलीचा फोटो दिसला. आणि त्याच वेळी आजी ने म्हणले 'किती मोठी झालीय ना?' मला थोडस उमगलं की हे लोक वृद्धाश्रमातील आहेत आणि ते त्यांच्या नातीचा फोटो पाहत होते. आजोबाना यापूर्वी थोडं पहिल्यासारखं वाटलं. म्हणून त्यांना मी सहज विचारलं 'फिरायला निघालात का' तेव्हा त्या दोघांनी माझ्याकडे पाहून हो म्हणले. आणि त्याच वेळी माझ्या लक्षात आलं की आजींचे डोळे पाणावलेले दिसत होते. बहुतेक त्यांच्या नातीची आठवण येत असेल. असं समजून मी पुढे निघालो थोडं पुढे जाऊन मी पुन्हा मागे वळून पाहिले तर ते दोघे पुन्हा मोबाईल मध्ये बघत होते. मी पुढे निघालो पण मनात विचारांचे वादळ तयार होत होते. मी एकटाच पुढे चालत होतो पण घरट्याकडे जाणाऱ्या पक्षांमधून मागे राहिलेला एक पक्षी अथांग पसरलेल्या आभाळात स्वतःशीच हुंकार टाकत जसा आभाळ कापत असतो तशी मी माझी वाट कापत होतो असे मला वाटले. एकामागून एक विचारांचे कोष तयार होत होते. त्या आजी आणि आजोबा यांचा चेहरा डोळ्यांसमोरून जात नव्हते. 

          फिरत फिरत गणपती मंदिराजवळ गेलो तिथल्या एक झाडाखाली कट्ट्यावर बसलो. आजून विचाराच्या सागरातून भावनेच्या लाटा येतच होत्या. असं का होत असेल आणि माझ्या बाबतीतच का प्रत्येक गोष्टीला भावनेच्या ओलाव्यात भिजवून त्यातून आपुलकीचा झरा शोधण्याचा प्रयत्न मी का करतो हेच कळत नाही. ज्याचं त्याच आयुष्य ज्याच्या त्याच्या समस्या पण या सगळ्यात गुरफटून मी माझं स्वतःच अस्तित्व कुठेतरी विसरतोय का? असं मला वाटत होतं. माझं कुटुंब माझे नातेवाईक माझा समाज यांच्याशिवाय मी स्वतः देखील आहे हेच मी विसरून चाललोय. 

          त्यामुळेच असं वाटायला लागलय की माझ्या आयुष्याची कातरवेळ तर नाही ना आली. विचार करता करता दिवस सरून गेला सगळीकडे अंधार दवडू पाहत होता मी पुन्हा परतीच्या वाटेला लागलो. गेल्या तासभरामध्ये मनात आलेल्या विचारांमधल्या कुठलं चांगलं आणि कुठलं वाईट याची बेरीज वजाबाकी करत घराजवळ आलो. गेटवर माझी मुलगी खेळत होती. मी अजून तिथपर्यंत पोचलो नव्हतो तोच माझे बाबा शेताकडून परतले त्यांना पाहताच माझी मूलगी खेळणं सोडून एका क्षणात त्यांना जाऊन बिलगली. त्यावेळी प्रत्यक्षपणे आजोबा आणि नातीचं नातं अनुभवत होतो.शेवटी लक्ष्यात आलं की आपल्या आयुष्याची आकडेमोड करण्याचा अधिकार आपल्यालाच असतो त्यात बेरीज करायची की वजाबाकी हे ज्यानं त्यानं ठरवावं…...🙏

                                             रोहित पाटील

                                          9421345169

ईच्छाओंके अनुरूप जिने का जुनून होना चाहिए,

​ ईच्छाओंके अनुरूप जिने का जुनून होना चाहिए ,   वरना परिस्थितीयां तो सदैव ही विपरीत होती है … आज डायरी उघडताच ...